प्रभू येशू ख्रिस्ताचे रोग्यांना स्पर्शाने व शब्दाने बरे करणे
Expository Keys in the Bible
(For Video click here: https://www.youtube.com/watch?v=irSx9EvcaB8&t=320s )
Sermon By : Rev.Dr. Rajkumar Kore
(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)
आपल्याला माहित आहे की, प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला होता आणि त्यावेळेस त्याने वेगवेळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार केले. काहीवेळेस त्याने रोग्याला हात लावून, स्पर्श करून बरे केले. परंतु काही रोग्यांना मात्र त्याने आपल्या शब्दाच्याद्वारे बरे केले. शताधीपतीचा जो चाकर आहे, त्याच्या बाबतीमध्ये त्याचा (शताधिपती) विश्वास येशूने पाहिला. तेथे शताधीपती म्हणतो “शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बारा होईल.” तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दानेच त्याला बरे केले. तो म्हणाला “जा तुझा चाकर बारा झालेला आहे” आणि प्रभू ज्या ताशी हे बोलला, त्याचवेळी, त्याच घटकेस त्याचा चाकर बारा झाला. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरी न जाता, तो शब्द बोलला आणि तो चाकर त्याच वेळेस बारा झाला असे आपण पाहतो. पण पेत्राची सासू मात्र तापाने आजारी होती आणि येशूने तिला कसे बरे केले? त्याने तिला हात लावला आणि तिला बरे केले. काही वेळेस त्याने हात लावला आणि काही वेळेस तो शब्द बोलला. ह्याच्यात कोणते गूज सामावलेले आहे ? या जगाची वाटणी देवाने फक्त दोन गटात केलेली आहे ते म्हणजे यहूदी आणि विदेशी. यहूदी कोण आहेत – अब्राहामापासून जे संतान झाले – अब्राहामाला इसाहाक झाला, इसाहाकाला याकोब झाला आणि याकोबाला बारा पुत्र झाले आणि त्या १२ पुत्रांपासून जे राष्ट्र झाले ते इस्राएल राष्ट्र हे आहेत यहूदी लोक. या अब्राहामाच्या "ब्लडलाईन" खेरीज जगातले जे सगळे आहेत त्याना बायबल मध्ये विदेशी असे संबोधले गेले आहे. तेव्हा, जगाची वाटणी २ गटात झालेली आहे, यहूदी आणि विदेशी म्हणजेच (Jews and Gentiles) येशू ख्रिस्त हा देह दृष्ट्या कोणाच्या वंशात किंवा कोणत्या गटात जन्माला आला हे सर्वाना माहित आहे. त्याला यहूदा वंशाचा सिंह म्हटलेले आहे. यहूदा वंशातून आपला प्रभू या पृथ्वीवरती जन्माला आला. परंतु तो स्त्रीचे संतान आहे हे लक्षात ठेवा. स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधाने तो जन्माला आला नाही तर, पवित्र आत्म्याच्या योगे तो गर्भी संभावला. म्हणून तो स्त्रीचे संतान आहे. प्रभू येशू यहूदी होता आणि त्याच्या देशात जेव्हा तो आला हे दर्शवण्यासाठी प्रतीकात्मक भविष्य की, जेव्हा तो स्पर्श करतो त्यावेळेला आपण पाहतो की, हे त्याचे पहिले येणे आहे. तो त्याच्या लोकांत आला, पण त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग आपण पाहतो की, त्याच्या लोकांनी म्हणजे यहूदी लोकांनी जेव्हा त्याचा स्वीकार केला नाही तेव्हा तो विदेश्यांच्याकडे वळतो, शब्दाने बोलतो. आता प्रभू आमच्याशी बोलतो, पण प्रभू देह दृष्ट्या आमच्यामध्ये नाही. तो स्वर्गात आहे, तिकडे पित्याच्या उजव्या हाताला बसला आहे पण त्याच्या आमच्याशी जो संपर्क आहे तो शब्दाच्या द्वारे आहे. शताधीपती हा विदेशी आहे Gentile आहे. त्याच्या बाबतीत हा जो झालेला चमत्कार आहे हे मंडळीचे दर्शक आहे. आज प्रभू मंडळीशी बोलतो परंतु तो देह दृष्ट्या पित्याच्या उजव्या हाताशी बसलेला आहे. एक वेळ येणार आहे की, प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस आपली आणि त्याची समोरा – समोर भेट होणार आहे.
ही छोटी छोटी जी चिन्ह आहेत, किंवा सिम्बोलिकरित्या ह्या गोष्टी किल्ल्या (Keys) आहेत. पवित्र शास्त्रामध्ये ज्यांचे वर्णन केले आहे. यांचा उपयोग पवित्र शास्त्रातील जे काळ वाटप आहे, जसे इस्राएलाचा काळ, नियम शास्त्राचा काळ, कृपेचा काळ, महासंकटाचा काळ, एक हजार वर्षे जो सौख्याचा काळ आहे ह्या काळांची वाटणी केलेली आहे आणि ही वाटणी समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या छोट्या छोट्या किल्ल्यांचा अनुबोधक रीतीने वापर करावा लागतो.
सारांश :
प्रभू येशूने केलेले सर्व चमत्कार हे ऐतिहासिक व वास्तव आहेत.परंतु त्यामागे गहन अर्थ दडलेला आहे.
पेत्राच्या सासूला स्पर्श करून बरे करणे ही क्रिया प्रभू येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवरील देहात येणे किंवा प्रभूचे पृथ्विवरील इस्रायेल राष्ट्रामधील वास्तव्य दर्शविते. पेत्राची सासू ही इस्रायेल राष्ट्राची येथे दर्शक आहे.शाताधीपतीच्या चाकराला शब्दाने बरे करणे हे प्रभूचे विदेशी मंडळीतील कार्याचे भविष्यात्मक चित्र आहे. येथे शताधीपती विदेशी मंडळीचा दर्शक आहे. इस्रायेलने नाकारल्या नंतर व त्याचे स्वर्गारोहण झाल्यानंतर म्हणजे प्रभू देहदृष्ट्या पृथ्वीवर नसताना गौरवी शरीरात स्वर्गात असताना पृथ्वीवरील मंडळीत जे कार्य करणार आहे त्याचे प्रतीकात्मक चित्र म्हणजे प्रभू येशूने शब्दाने शताधीपतीच्या चाकराला बरे करणे .
स्पर्श हा निकट उपस्थिती दर्शवतो (प्रभूचे पहिले येणे ) मात्र शब्द हा प्रभू देहात या पृथ्वीवर नसताना मंडळीत जे कार्य करीत आहे त्याचे दर्शक आहे .
God Bless You.
रेव्ह. डॉ .राजकुमार कोरे
२३ सप्टेंबर २०२३
コメント