पशूंचे रक्त का सांडले जात होते?
Why the blood of an animal was shed in the Old Testament Times?
(For video Click: https://www.youtube.com/watch?v=aeQ9aaLDm68&t=90s)
Sermon By: Rev.Dr. Rajkumar Kore
(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)
Credits :Marian van der Kruijt.Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 InternationalLicense.FreeBibleimages.org
लेवीय पुस्तकात दिलेल्या यज्ञार्पणामध्ये पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पशूचे रक्त सांडले जात होते. का बरे पशूचे रक्त सांडले जात होते ? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. रक्त का सांडले जात होते याचा खुलासा करणारे एक वचन आहे लेवीय १७ : ११ मध्ये असे म्हटले आहे “कारण शरीराचे जीवन हे रक्तामध्ये आहे” शरीराचे जीवन हे रक्तामध्ये असते आणि रक्त जेव्हा सांडले जाते तेव्हा त्या जीवनाचा अंत होतो. म्हणजेच सांडलेले रक्त हे मृत्यूचे दर्शक होते.
आता प्रश्न असा आहे की, या मृत्यूची काय गरज लागत होती ? आपण पाहिले की, पाप आणि मरण यांचा एक नियम पवित्र शास्त्रात दिलेला आहे, आणि अतिशय महत्वाचा तो नियम आहे. “ज्या दिवशी तू फळ खाशील त्याच दिवशी तू खचित मरशील” म्हणजे ज्या वेळेस मनुष्य आज्ञाभंग करणार त्यावेळेला तो निश्चितच मृत्यूला सामोरा जाणार असा नियम देवाने अगोदरच सांगून ठेवला होता. जिथे पाप तिथे मृत्यू हा निश्चित आहे. हा वैश्विक नियम आपण समजू शकतो
.
येथे आपण “वैश्विक” हा शब्द का वापरला ? पहिले पाप कुठे घडले ? पृथ्वीवरचे पहिले पाप एदेनात घडले पण त्याही अगोदर पाप घडले होते. लुसिफराने स्वर्गात देवाविरुद्ध बंडाळी केली तेव्हा तेथे या विश्वात पापाचा उगम झाला. बऱ्याच विधर्मी लोकांच्यामध्ये चुकीचे Concepts आहेत की, पाप आणि पुण्य अनादी काळापासून चालू आहे. असे मुळीच नाहीये. देव हा परिपूर्ण आहे. God is perfect. परिपूर्ण देव अपरिपूर्ण गोष्ट निर्माण करीत नसतो. पवित्र देव पापमय गोष्टी निर्माण करीत नसतो. एखादा Engineer बेस्ट Engineer जर असेल तर बेस्ट गोष्ट तयार करणार. मग ते पूल बांधणी असो, यंत्र निर्मिती असो, He will do his level best. देव तर पवित्र आहे, परिपूर्ण आहे, तेव्हा तो पापमय अशी निर्मिती करेल हा Concept बायबलला मान्य नाही. मग विश्वात पाप आणि मरण याचा नियम का ? कारण पृथ्वीच्या बाहेर देखील पाप घडलेले आहे, जे विश्वात घडलेले आहे, आणि पहिली जी शिक्षा आहे, या विश्वामध्ये की, लुसिफर आणि त्याच्याबरोबर सामील झालेल्या बंडखोर दूतांना मिळालेली आहे.
मग पृथ्वीवर जेव्हा आपण पाहिले की, पाप हे आदाम आणि हवेच्याद्वारे मनुष्य जातीमध्ये पसरले आणि पापाचा परिणाम देखील या पृथ्वीवरती आला. पापाचा परिणाम म्हणजे पापाचे वेतन मरण आहे. आपण बघितले की, पवित्र शास्त्रात Equal justice आहे. मरणासाठी मरण, हातासाठी हात, डोळ्यासाठी डोळा हा Equal justice आहे. एखाद्याने खून केला आणि न्यायधीशाने त्या खुन्याला जर फाशीची शिक्षा दिली तर आपण न्यायधीशाला क्रूर आहे असे म्हणत नाही. कारण प्रत्येक मनुष्याच्या हृदयात कोठेतरी Equal justice ची demand असते. कारण आमचा देव हा न्यायी आहे. प्रीती हा जसा त्याचा एक अविभाज्य गुण आहे, तसाच न्यायीपण हा देखील त्याचा अविभाज्य गुण आहे. Eternal Attribute. आणि त्यामुळे मरणाबद्दल मरण. मनुष्याला जर मरणामधून जर वाचवायचे असेल तर दुसरा कोणीतरी त्याबद्दल मरण पावला पाहिजे. याला आपण Substitution म्हणतो . एकाच्या बदल्यात दुसरा कोणीतरी तो दंड फेडणे. परंतु आपण हे पाहिले की, लेवीय १७ : ११ मध्ये देव नियम सांगत होता की, शरीराचे जीवन रक्तात असते, म्हणजे सांडलेले रक्त हे मृत्यूचे दर्शक आहे. परंतु हे रक्त सांडण्यासाठी “मी तुम्हाला ते वेदी वरती प्रायश्चित्त करण्यासाठी दिले आहे.” असे देवाचे वचन उर्वरित लेवीय १७ : ११ च्या भागात सांगत आहे. याचा काय आहे ? देवाला माहित होते की, पापी मनुष्याकडून हा दंड भरला जाउच शकत नाही. म्हणून त्याच्यावर उपाय देखील देवाने अगोदरच लेवीयच्या पुस्तकात सांगितला होता की – “मी तुम्हाला ते वेदी वरती सांडण्यासाठी दिले आहे.” वास्तविक पाहता पाप मनुष्याकडून घडले होते, शिक्षा मनुष्याला व्हायला पाहिजे होती आणि त्याचा दंड मनुष्याने भरणे अपेक्षित होते. परंतु या ठिकाणी देवाचे वचन सांगते – “हा मनुष्याचा दंड दुसरा कोणीतरी भरणार होता आणि तो दुसरा कोणीतरी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त होता.”
लेवीय पुस्तक लिहिण्याच्या अगोदरच देवाने ही prophecy right in the Eden Garden म्हणजेच एदेन बागेमध्ये दिली होती. लक्षात ठेवा आपण Substitution हे Doctrine बघत आहोत. एकाच्या बदल्यात दुसरा. Gospel was preached in the Garden of Eden. एदेन बागेमध्ये सुवार्तेची घोषणा झाली की, ‘स्त्रीचे संतान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो स्त्रीचे संतान बनून येणार होता या जगामध्ये तो सापाचे म्हणजे सैतानाचे डोके ठेचणार होता, म्हणजेच सैतानाला पूर्णपणे पराभूत करणार होता.’ त्याची नांगी मोडणार होता.
God Bless You.
Rev. Dr. Rajkumar Kore
Comments