top of page
Search
Writer's pictureRajkumar Kore

आपला साक्षीरुप प्रकाश कसा पाडवा व दीपवृक्षाचे रहस्य



Rev.Dr.Rajkumar Kore


(मत्तय 5:16)

"तुमचा प्रकाश इतरांसमोर प्रकाशू द्या' ही आपल्या प्रभू येशू खिस्ताची आपल्याबाबत इच्छा आहे हे बायबल वरून आपल्याला समजते.


ही प्रभूची इच्छा आपल्याला कशी पूर्ण करता येईल?

जुन्या करारात देवाने इस्त्राएल लोकांना निवास मंडपातील प्रकाशासाठी दीपवृक्षाची सोय केली होती. म्हणजेच जर आपल्याला प्रकाश देणारे बनायच असेल तर आपल्याला शास्त्रातील दीपवृक्षाप्रमाणे बनावे लागेल.

खर तर प्रकटीकरणात आपला प्रभू स्वतः मंडळ्यांना समया किंवा दिवठण्या म्हणत आहे.

(प्रगटी 1:20)

”ज्या सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्याचा गुपित अर्थ हा आहे की, सात समया हया सात मंडळ्या आहेत”


याच्या पुढे जाऊन प्रभू प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रकाश देणारा म्हणजे दुसऱ्या शब्दात बोलायच झाल तर दीपवृक्ष किंवा दिवठणीवर ठेवलेला दिवा बनण्यास सांगत आहे.

(मत्तय 5:16)

“तुमचा प्रकाश इतरांपुढे या प्रकारे प्रकाशू द्या की जेणे करून त्यांनी तुमची चांगली कामे पहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे”

आणखी वचन 15 सांगत आहे,

“आणि दिवा लावून तो कोणी टोपली खाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो”

(मत्तय 5:15)

प्रभू सांगत आहे, की, तुमचा प्रकाश इतरांसमोर प्रकाशू द्या. म्हणूनच प्रत्येक विश्वासणारा हा दिवा बनला पाहिजे. प्रत्येक विश्वासणारी मंडळी ही सोन्याची समय बनली पाहिजे.


प्रगटीकरण 1:20 मध्ये सोन्याच्या समयीसाठी मूळ ग्रीक भाषेत “लुखनीआ” हा शब्द वापरलेला आहे इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ लम्पटँड असा होतो.

मूळ हिब्रू भाषेत जुन्या करारात सोन्याच्या समयी साठी किंवा दीपवृक्षासाठी “मेनोराह” हा समांतर शब्द वापरलेला आहे. या मेनोराची म्हणजेच दीपवृक्षाची सविस्तर रचना निर्गम 25:31 ते 40 मध्ये दिलेली आहे.


आज देवाचे वचन सांगत आहे की,

"तुमचा प्रकाश इतरांसमोर प्रकाशू द्या” म्हणजेच शास्त्रातील दीपवृक्ष बना .


"शास्त्रातील दीपवृक्ष कसा होता ?"


1.तो शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष होता.

2.तो घडीव दीपवृक्ष होता.


3.तो अखंड दीपवृक्ष होता.


4.त्याला मध्यकणा, सहा शाखा, आणि बैठक होती.


5.त्याला बोंडे, फुले व वाट्या होत्या.


6.त्या दीपवृक्षावर सात दिवे होते.


7.तो दीपवृक्ष देवाने दाखवलेल्या नमुन्या बरहुकूम होता .



1) तो शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष होता


(निर्गम 25:31)

“शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर”

आम्हाला शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष बनायच आहे. शुद्ध सोने हे पवित्रतेचे दर्शक आहे कारण,


(निर्गम 28:36) सांगते,

“शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी व तिच्यावर मुद्रेच्या कोरण्या प्रमाणे “यहोवा साठी पवित्र असे कोरून काढ”आपल्याला जर आत्मिक प्रकाश देणारा दीपवृक्ष बनायच असेल तर पवित्र जीवनाशिवाय पर्याय नाही.


(लेवीय 11:44 ) सांगते,

“मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे म्हणून तुम्हीही आपणास पवित्र ठेवावे”

परंतु मंडळी अशुद्ध कशी बनते याचे उत्तरही बायबल देत आहे,


(मत्तय 15:18-20)

“परंतु ज्या गोष्टी तोंडातुन बाहेर निघतात त्या अंतःकरणातुन येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. कारण वाईट विचार, खून व्यभिचार जारकर्मे, खोच्या साक्षी, निंदा ही बाहेर निघतात अंतकरणातुन या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात.”


यातील काही गोष्टी किती सहजतेने आपण आपल्या जीवनात व मंडळीत करत असतो त्यामुळे आपण अशुद्ध होत आहोत हेच आपल्याला समजत नसत. त्यामुळे आपण देवाच्या सेवेसाठी अपात्र ठरत असतो. त्यामुळेच आमच्या कडे दीपवृक्ष आहे पण त्यातून प्रकाश बाहेर पडत नाही.


“शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर”

सोन्याची तुलना पवित्र शास्त्रात आपल्या विश्वासाशी केलेली आहे.


(1 पेत्र 1:17)

“म्हणजे नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, प्रशंसेला गौरवाला व मानाला कारण व्हावी “


आज मंडळीतून साक्षी का तयार होत नाही व साक्षीचा प्रकाश लोकांना का दिसत नाही याचे दुसरे कारण अग्नितुन पारखलेला आरंभीच्या मंडळीसारखा दृढ विश्वास आपल्या मंडळीने कुठेतरी हरवला आहे. शुद्ध सोन्या ऐवजी म्हणजे दृढ विश्वासा ऐवजी मानवी शहाणपण या दीपवृक्षात मिश्रीत झाल्याने मंडळीत चमत्कार दिसत नाही , परंतु, काही अति विद्वान लोक असे शिक्षण देतात कि आता आरंभीच्या मंडळीचा म्हणजे प्रेषितांचा काळ चालू नाही त्यामुळे “ प्रभू आज चिन्ह चमत्कारांद्वारे मंडळींची भेट घेत नाही व मंडळीने चिन्ह चमत्काराची आजच्या काळात अपेक्षा करू नये “ अशी माणसे मंडळीला विश्वासात कमजोर बनवत असतात त्यामुळेच मंडळीमधुन प्रभूच्या गौरवशाली कार्याच्या साक्षीचा प्रकाश आपल्या दीपवृक्षातुन जगापुढे पडत नाही.


हे मंडळी जागृत हो! शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष बनव!

कारण तुमचा प्रकाश इतरांसमोर प्रकाशवा, असे प्रभु म्हणतो.


2) तो घडीव दीपवृक्ष होता


(निर्गम 25:31)

” हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा”

"And thou shalt make a Candlestick of beaten work"

’घडीव काम यासाठी मूळ हिब्रू भाषेत “मिकशा” हा शब्द वापरला आहे. इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ

Beaten out of one piece moulded by hammering.

म्हणजेच हातोड्याच्या धावांनी एकाच तुकड्यामधून घडवलेला असा अर्थ त्यातून निघतो, देवाला मान्य असा दीपवृक्ष आपल्याला किंवा आपल्या मंडळीला बनायच असेल तर घावांच्या अनुभवातून जाणे आवश्यक असते.

पण असे का ? प्रभु आपल्याला धावांच्या अनुभवातून का जायला सांगतो ?


याच महत्वाच कारण म्हणजे आपल्यामध्ये असलेला देह स्वभाव, जुना मनुष्य हा नैसर्गिक हट्टी स्वभाव आत्मिक स्वभावाचा शत्रू आहे. त्याच्याचमुळे आम्ही आपल्यातून प्रकाश पडू शकत नाही परंतु आपल्या वरील प्रत्येक परीक्षा, प्रत्येक छळ, प्रत्येक वेदना इतर सहकार्यान पासून किंवा बंधुजनापासून झालेला आपला द्वेष, आपला धिक्कार त्यांनी केलेला आपला तिरस्कार, रिजेक्शन, निग्लिजन्स हे सर्व हातोड्याचे घाव आपल्यातील देह स्वभावाला काबूत आणून आपल्यातील आत्मिक मनुष्य मजबुत बनवत असतात.ख्रिस्ताला आमच्या मधून प्रगट करण्याची आम्हाला संधी देत असतात. आम्हाला घडीव सोन्याचा दीपवृक्ष बनवत असतात.


3) तो अखंड दीपवृक्ष होता


(निगम 25:36)

”त्याची बोंडे त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी; तो संबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा”


(निर्गम 25:39)

”ह्या सर्व उपकरणांसहीत हा दीपवृक्ष एक किफ्कार शुद्ध सोन्याचा करावा”

देवाने सांगितल्या प्रमाणे जर आपल्या मंडळीला दीपवृक्ष बनायच असेल तर आपल्या मंडळीला अखंड दीपवृक्ष बनाव लागेल.


पण हा अखंड दीपवृक्ष आपल्या मंडळीला कसं बनता येईल?

हातोड्याच्या धावांनी घडवलेला दीपवृक्षच अखंड असतो. सॉल्डरींग किंवा वेल्डिंगने जोडलेल्या वस्तूंना अखंडत्व नसते.पण हे सोल्डरिंग काय आहे ?


वरपांगी आस्था, वरपांगी प्रीती, सहेतूक लोभजनक मैत्री हे सगळे मंडळीतील सौल्डरींगचे स्पॉटस आहेत व ते तुटणारे असतात. स्वार्थाने प्रस्थापित झालेली युती ही फारकाळ एकत्र टिकत नाही म्हणूनच प्रेषित पौल


(1 करिंथ1:18) मध्ये म्हणत आहे,

”प्रथम मी ऐकतो की, मंडळी मध्ये तुम्ही एकत्र जमता तेथे तुमच्या मध्ये फुटी असतात.”

तसेच,


(1 करिंथ 1:12-13) सांगते,

“तुमच्यातील प्रत्येक जण म्हणतो, मी पौलाचा आहे, मी अपुलोचा आहे मी केफाचा आहे, मी ख्रिस्ताचा आहे. ख्रिस्त विभागला गेला आहे काय ?”

मंडळीतील गटबाजी ही मंडळीच्या आत्मीक ऐक्याला घातक असते. मंडळीतील एल्डर्सची जेव्हा निवड होत असते त्यावेळी


(प्रेषित 6:3) प्रमाणे चित्र दिसण्या ऐवजी, राजकीय इलेक्शन मध्ये जे घृणास्पद डावपेच, दैहीक डामडौल, आणि गलिच्छ राजकारण चालत तेच मंडळ्यामध्ये आणल जातं, या गोष्टी करणारे देवाला भित नाहीत व यहोवाचा शब्द तुच्छ लेखतात तो असा की, ”ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे “


वास्तविक पाहता (प्रेषित 6:3) प्रमाणे,

”तर बंधुजनानो तुम्ही आपल्यामधुन पवित्र आत्म्याने, व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठीत पुरुष शोधून काढा त्यांना आम्ही या कामावर नेमू.” आणि त्यांनी विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण त्याची निवड केली.


(प्रे. 6:3,4,5)

पवित्र आत्म्याने पूर्ण, ज्ञानाने पूर्ण, विश्वासाने पूर्ण, प्रतिष्ठित, नाव लौकीकाने पूर्ण अशा व्यक्तिंची प्रार्थनेव्दारे व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाव्दारे निवड करणे ही पवित्र मंडळ्यांमधील कोणत्याही निवड प्रक्रीयेची पद्धत आहे.

मानवी शहाणपण, जगीक बुद्धी वापरून मानवी नियमांनी पवित्र स्थानातील आत्मिक जागांच्या निवडी करायच्या नसतात.


नादाब व अबिहू यांनी अशास्त्रोक्त धूप जाळल्यामुळे त्यांचा नाश झाला हे बायबल मधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते.


हे मंडळी हे लक्षात ठेव की, अखिल पृथ्वीचा प्रभू, सैन्याचा यहोवा सेनाधिश परमेश्वर याच्या समोर आपण उभे आहोत व सर्व गोष्टींचा जाब आपल्याला द्यावा लागणार आहे. ज्या वेळेस आमच्या मंडळी मध्ये,


(इफिस 4:5) प्रमाणे,

"एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा, एकच देव, जो सर्वांचा पिता जो सर्वावर आणि सर्वांमधुन आणि सर्वांमध्ये" दिसेल तेव्हा, मंडळी हा शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, एकाच तुकड्यातुन घडवलेला जो अखंड आहे असे होईल.


(निर्गम 87:24) सांगते,

“त्याने तो दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार सोन्याची बनवली” पण,

हिब्रू 1 किक्कार ( ग्रिक = 1) टॅलेंटच का ?


कारण एक हा अंक मंडळीतील ख्रिस्तामधले ‘ऐक्य” म्हणजेच एक आकडा युनिटी दर्शवितो. ख्रिस्ताच्या मंडळीत ½ किक्कार नको, पाउण किक्कार नको, तर एक किक्कारच पाहिजे. म्हणजे 100% ऐक्य पाहिजे हिच देवाची मंडळी साठी इच्छा व योजना आहे. खर तर आपल्या प्रभु येशूने त्यासाठीच तर थोर मध्य्स्तीची प्रार्थना मंडळीसाठी केली आहे.


“त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या जसा तू माझ्या मध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनीही तुझ्या माझ्या मध्ये एक व्हावे “


किती महान मध्यस्तीची प्रार्थना होती ही!

प्रियांनो देव सांगत आहे की, अखंड दीपवृक्ष बनवा.


4) त्याला मध्यकणा सहा शाखा आणि बैठक होती


(निर्गम 25:81-32)

“त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. या दीपवृक्षाला सहा शाखा असाव्यात त्याच्या एका बाजूला तीन शाखा व दुसऱ्या बाजुला तीन शाखा असाव्या.” दीपवृक्षाच्या मधोमध एक दांडा होता. याला दीपवृक्षाचा मध्यकणा देखील म्हणता येईल या कण्यातुन एका बाजुला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा निघाल्या होत्या. दोनही बाजूस मध्यकण्यातून दोनही निघालेल्या दीपवृक्षाच्या शाखा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या द्राक्षवेल व फाट्यांची आठवण करून देतात.


(योहान 15:5) मध्ये आपला प्रभू म्हणतो,

“मीच वेल व फाटे आहात “ याचाच अर्थ दीपवृक्षाचा मध्य कणा हा देखील ख्रिस्ताचा दर्शक आहे (बोंडे, वाट्या, फुले यांना व शाखांना आधार मध्यकणा होता तसा ख्रिस्त हा मंडळीचा आधार आहे.


जशा शाखा मध्यकण्याला जोडलेल्या होत्या तसेच मंडळी देखील ख्रिस्ताशी सतत जोडलेल्या अवस्थेत म्हणजेच ख्रिस्ताशी सतत आत्मिक सहभागितेत असणे आवश्यक आहे.

ख्रिस्तांच्या समक्षतेत मंडळी जर सतत असेल तरच मंडळी हा प्रकाश देणारा दीपवृक्ष बनु शकते कारण प्रभू म्हणतो,


(योहान 15:4-5)

“तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हा मध्ये शरीन जसे फाटा वेळात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण त्याला फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिच्यावाचून तुम्हालाहि देता येणार नाही”


5) त्याला बोंडे, फुले. व वाट्या होत्या


(निर्गम 25:33)

“प्रत्येक शाखेला बदामाच्या फुला सारख्या तीन तीन वाय्या बोंडा फुला सह असाव्यात “


V37. “आणि त्याच्यासाठी सात दिवे करून दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला त्यांचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावर ठेवावे.”

बोंडे, वाट्या, फुले हे त्र्यैकत्व सूचीत करतात.


1) बोंडा हा बंद होता = त्याच्या आतील काही दिसत नव्हत बोंडा हा जणू बंद कळी प्रमाणे होता.अगदी तसेच, पित्याला कोणी कधीही पहिले नाही.


2) फुल = हे कळीला प्रगट करते. ख्रिस्ताने पित्याला प्रगट केल आहे.


3) वाट्या = बदामा प्रमाणे बनवल्या होत्या.


Ex25:34

(made like almonds= shows fruit)

हे फळाचे दर्शक आहे आणि पवित्र आत्म्याचे दर्शक आहे कारण पवित्र आत्माच आपल्यामध्ये फळ निर्माण करतो.आपल्या मंडळीचा विश्वास त्र्येक देव म्हणजे पिता, पुत्र, पवित्र आत्म्यावर आधारलेला पाहिजे तरच आपला दीपवृक्ष खरा आणिविश्वासु साक्षिदार म्हणून जगापुढे जिवंत देवाचा प्रकाश देणार साधन म्हणून पात्र ठरेल.


6. त्या दीपवृक्षाला सात दिवे होते .


हे पेटलेले सात दिवे पुन्हा पवित्र आत्म्याचे दर्शक आहेल.

(प्रगटी 4:15)“राजासनाच्या आतुन विजा, वागी मेघगर्जना निघत होत्या; पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत त्या देवाचें सात आत्मे आहेत.”

(यशया 11:2) मध्ये ,

आपण एकाच पवित्र आत्म्याचे सात नानाविध पैलू पाहतो.


7. तो दीपवृक्ष देवाने सांगितलेल्या नमुन्य बरहुकूम बनवलेला होता.


आपण जर देवाने दिलेल्या नमुन्या प्रमाणे दीपवृक्ष बनलो तर पवित्र आत्म्याच्या सात नाना विध पैलूंचा अभिषेक आज आपणावर होईल. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचे सात पैलू. (यशया 11: 2) मध्ये सांगितले आहेत.


1) यहोवाचा आत्मा :

(The Spirit of Jehovah)

त्र्यैकत्त्वातील, देव जो पवित्र आत्मा त्याचे वैयक्तिक व्यक्तिमत्त्व तसेच नवा जन्म देणारा, तारणात आणणारा देवाचा आत्मा.


2) ज्ञानाचा आत्मा :

(The Spirit of Wisdom)

बाह्य रूपावरून किंवा गुणावरून गोष्टीची पारख करण्याची एखाद्याला बुद्धी देणारा देवाचा आत्मा.


3) बुद्धिचा आत्मा :

(The Spirit of Understanding)

बाह्य रुपावरून किंवा गुणावरून वेगवेगळ्या गोष्टींमधला फरक जाणण्याची बुद्धी देणारा देवाचा आत्मा.


4) बोधाचा आत्मा :

(The Spirit of Counselling)

योग्य निष्कर्ष काढण्याची बुद्धी, योग्य सार काढण्याची बुद्धी पुरवठा करणारा देवाचा आत्मा.


5) पराक्रमाचा आत्मा :

(The Spirit of might)

एखादी गोष्ट सामर्थ्याने पूर्णत्वात नेण्याची क्षमता देणारा घोषणा करण्याचे सामर्थ्य देणारा, आत्मिक शत्रुवर अधिकार गाजविण्याचे सामर्थ्य देणारा व सर्व प्रकारचे सामर्थ्य विश्वासणाऱ्याला देणारा देवाचा आत्मा.


6.परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा :

(The Spirit of Knowledge ofJehovah)

देवाशी असलेल्या वैयक्तिक प्रीतीने व सहभागीतेतून देवाविषयी मिळालेले ज्ञान , देवाचे गुण- स्वभाव, देवाच्या गूढ गोष्टी, देवाच रहस्य, योजना जाणण्याचे ज्ञान देणारा देवाचा आत्मा.

(Special priviledges about this knowledge)


7) परमेश्वराच्या भयाचा आत्मा:

(The Spirit of Fear a Jehovah)

परमेश्वरा विषयी आदरयुक्त भिती परमेश्वराचा सन्मान, भक्तिभाव देवभिरू जीवन जगण्यास सक्षम करणारा देवाचा आत्मा.


अशाप्रकारे देव आपल्याला उपरोक्त सात प्रकारच्या अभिषेकाने भरण्यास उत्सुक आहे

प्रियांनो आज आपण आपल आणि आपल्या मंडळीच आत्मपरिक्षण करू या. आमचे दिवे पेटलेले आणि मशाली जळत आहेत का ? आज, प्रभु सांगत आहे तुमचा प्रकाश इतरांसमोर प्रकाशू द्या.आमच्या मशाली विझलेल्या असतील आणि आमचे दिवे पेटलेले नसतील तर आज प्रभू आम्हाला आणि आमच्या मंडळीला पुन्हा सांगत आहे,

”उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुजकडे आला आहे


परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. “


आपल्या देव बापाची कृपा व शांती तुम्हासह असो.

आमेन.


God bless you.


रेव्ह.डॉ. राजकुमार कोरे


PART - 2




THE HIDDEN MYSTERY OF THE GOLDEN CANDLESTICK

Rev.Dr .Rajkumar Vikram Kore


In the Tabernacle of Moses there was a Golden Lampstand or Candlestick , which was made according to the pattern which God had given to Moses.

(Exodus 25:31-36)


There were three basic units or ornaments repeated in this candlestick namely,

the Knops , the Flowers , and the Bowls in the construction of the whole lampstand.


(In the above picture the Knop is shaded in Blue colour, the Flower is in the Red colour, and the Bowl is shaded in Yellow colour just for the identification of these three units.)


There are total seven branches to the Golden Candlestick. Each branch consists of total nine units except the middle one which has total twelve units, so if we calculate:


6 Branches X 9 Units = 54

1 Middle Br. X 12 Units = 12

--------------------------------------

Total Units = 66


What does this calculation means to us?

Do you know that God has symbolically predicted that the Bible will be composed of 66 books through this lampstand? Count the Total units or knops , bowls and flowers of this lamp stand in the picture by yourself and you will be amazed to find exactly 66 units. Fascinating truth!


No more! or no less!! than 66 !


Bible says that the Word of God is Like a Lamp that means the Bible is compared to the lamp by the Holy Spirit.

(Ps.119:105)

God told Moses to construct the Golden Lampstand in this pattern and this was told about 1450-1500 BC


Now we have seen that the lamp stand symbolises the Bible, that means, about 1500 years in advance God had told us that how many books will be there in the Bible ! Amazing!!!


There is another mystery here, The Knop represents God the Father because the Knop is closed.No one can see what is inside the Knop. In similar way , no human has seen God the Father (John 1:18)


Now the Flower reveals or manifests the beauty and the fragrance of the closed bud. So it represents God the Son who reveals the Father as our Lord Himself told us that, Whoever has seen me has seen the Father.(John 14:9)


Jesus Christ is God manifested in flesh.(1Tim. 2:16)


The Bowl represents the Holy Spirit. We know that the Aaron's rod had buds,flowers, and Almond fruits.

Now, the fruit is symbolic of the Holy Spirit , because the Holy Spirit produces the spiritual fruit in us.(Galatians 5: 22-23)


So in short, the Knop, the Flower and the Bowl in the Lamp Stand was clear picture of the Trinity of the Bible.

What a marvelous depiction !!!

Glory to God.


Now look at an another truth in the Lamp Stand. There are 3 Knops at the base of the

Central Branch


(In this picture shaded in Blue,Red and Yellow colours just for your identification)


Why these 3 extra knops at the base of the centre of the lamp stand?


Because it represents the Father, the Son and the Holy Spirit , they are Co-Equal, Co-Eternal and Co-existent divine being having the same substance.It also indicates that the Bible is written by the Triune God. Our Triune God is the foundation of the Holy Bible.


What a deep knowledge wonderful wisdom of our Lord God in giving the pattern of the Golden Candlestick or the Golden Lamp Stand.


Glory to His precious name.

Amen


God bless you.


Rev. Dr. Rajkumar Vikram Kore








350 views0 comments

Comentarios


bottom of page