देव आपणास पवित्र आत्म्याने पूर्ण होण्यास का सांगत आहे?
लेखक
रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे
" आत्म्याने परिपूर्ण व्हा "
(इफिस , ५:१८ )
" Be filled with the Spirit "
( Eph . 5 " 18 )
By Rev. Dr. Rajkumar Kore
देवाची ही इच्छा आहे की आपण आत्म्याने पूर्ण व्हावे. पण आपल्याला
आत्म्याने परिपूर्ण का व्हायचे आहे?
(प्रेषित ४:३१ , प्रेषित ४ : ८-१३)
१) धैर्याने देवाचे वचन सांगण्यासाठी:
ते सर्व परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. (धैर्य प्राप्त होते)
आत्म्याने परिपूर्ण झाल्याशिवाय देवाचे वचन आपण धैर्याने बोलू शकत नाही. येशूचे शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण जोपर्यंत झाले नव्हते तोपर्यंत ते भीतीने दार बंद करून बसले होते .
(योहान , २० : १ ९)
"त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हास शांती असो ."
परंतु नंतर प्रेषित २ : ४ नंतर म्हणजे " तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यावर पेत्राने मोठ्या धैर्याने यहुद्यांच्या मोठ्या जमावासमोर देवाचे वचन उघडपणे सांगितले तेव्हा त्यांच्यामध्ये ३००० माणसांची भर पडली .
देवाचे वचन धैयाने सांगण्यासाठी पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे .
२ ) देहवासनांना नाकारण्यासाठी:
"आत्म्याच्या प्रेरणेने चाला , म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही ."
(गलती . ५:१६)
पण आत्म्याने भरल्याशिवाय आत्म्याच्या प्रेरणेने कसे चालणार ?
आणि आत्म्याने भरल्यावर आपण देहाच्या स्वाधीन राहत नाही . कारण
देहवासना आत्म्याविरुद्ध व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे . वचन १७
"देहाची कर्मे तर उघड आहेत ती ही
जारकर्म , अशुद्धपणा , कामातुरपणा , मूर्तिपूजा , चेटके , वैर , कलह , मत्सर , राग , तट , फुटी , पक्षभेद , हेवा दारुबाजी , रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही ."
आत्म्याने जर आपण चाललो तर देहवासनांचे आपण गुलाम होऊ शकत नाही . तर आपल्या मध्ये
आत्म्याच्याद्वारे आत्मिक फळ निर्माण होते ते : प्रीति , आनंद , शांती , सहनशिलता , ममता , चांगुलपण , विश्वासूपणा , सौम्यता , इंद्रियदमन .
"कारण जो देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल ."
( गलती . ६ : ३ ) (प्रेषित ७:५५)
३) दैवी प्रगटीकरण मिळण्यासाठी:
"परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने
आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजावीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला ."
आत्म्याने पूर्ण झाल्यावर आपण येशूसाठी परीक्षा प्रसंगातुन जात असताना आपणासाठी स्वर्ग उघडतो व दैवी प्रगटीकरण आपल्याला होते .
४ ) पवित्र आत्म्याच्या दानांनी भरण्यासाठी :
(प्रेषित २ : ४)
"तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी
त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले ."
(प्रेषित १ ९ : ६ )
इफिस येथील घटना
"आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले , तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला ; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले
व ईश्वरी संदेश देऊ लागले ."
पवित्र आत्म्याने भरल्यानंतर देव आपल्याकडून पवित्र आत्म्याच्या वेगवेगळ्या दानांचा उपयोग करून
घेतो .
७ ) पारख बुद्धी प्राप्त होण्यासाठी :
(प्रेषित १३ : ९ -१३)
"तेव्हा शौल ज्याला पौलहि म्हणत , तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला , अरे सर्व कपटाने व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा , अवघ्या नीतिमत्त्वाच्या वैऱ्या , तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय ? तर पाहा , आता प्रभूचा हात तुला प्रतिकुल आहे , तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना
अंधारी आली तेव्हा आपणाला कोणीतरी हाती धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला ."
जेव्हा आपण पवित्र आत्म्याने पूर्ण होतो तेव्हा आपल्याला भेद जाणण्याची पारख बुद्धी किंवा आत्मे ओळखण्याचे ज्ञान प्रभू पासून प्राप्त होते .
आणि चमत्कार करण्याचे सामर्थ्य देव आपल्या शब्दांना देतो .
६ ) बुद्धी, ज्ञान, कसब मिळण्यासाठी:
(निर्गम ३१ : १-३ , निर्गम २८ : ३)
"मग परमेश्वर मोशेला म्हणाला पाहा मी यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याल अक्कल , बुद्धि , ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे .
ज्याला देव आत्म्याने परिपूर्ण करतो त्याला देव अक्कल , बुद्धी , ज्ञान व कसब देतो. मंडळीच्या बांधणीसाठी व मंडळीच्या वृद्धीसाठी त्याचा उपयोग होतो.
७ ) विजय प्राप्त होण्यासाठी :
लुक . ४ : १
"आणि येशू पवित्र आत्म्याने पूर्ण असलेला असा यार्देनेपासून परत आला आणि आत्म्याने त्याला रानात
नेले ."
पवित्र आत्म्याने जेव्हा आपण पूर्ण होतो तेव्हा सैतानाचे सर्व बाण आपण आत्म्याच्याद्वारे तोडून टाकतो व येशू जसा सैतानावर विजयी झाला तसे आपण विजयी होतो . परीक्षेत विजयी होण्यासाठी आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे .
आत्म्याने परिपूर्ण व्हा ! (इफिस . ५:१८)
१ ) धैर्याने देवाचे वचन सांगण्यासाठी.
२ ) देहवासना ठार मारण्यासाठी.
३ ) दैवी प्रगटीकरण व दृष्टांतासाठी.
४ ) पवित्र आत्म्याच्या दानांसाठी.
५ ) आत्मे ओळखण्यासाठी .
६ ) मंडळीच्या बांधणीसाठी अक्कल , बुद्धी , ज्ञान व कसब मिळण्यासाठी .
७ ) सैतानी परीक्षेत सैतानावर विजय मिळवण्यासाठी .
पुरावा ( वचनाचा आधार ) :
प्रेषित आत्म्याने परिपूर्ण झाले होते .
देवाचे कार्य करण्यासाठी येशू ख्रिस्त्याच्या प्रेषितांना देखील आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज होती .
(प्रेषित . २ : ४)
" तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले ."
(प्रेषित ४ : ८)
"तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता"
(वचन . ३१)
"आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले."
(प्रेषित . ६ : ३-५)
"तर भावांनो तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशी ७ अब्रुची माणसे शोधून काढा."
(प्रेषित . ९ : १७)
"ते यासाठीकी तुला तुझी दृष्टी पुन्हा मिळावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे .
( हनन्या हा दिमिष्कातील प्रभूचा एक शिष्य होता. तो शौलाला हे म्हणाला )
(प्रेषित ११:२४)
"कारण तो चांगला माणूस होता आणि
पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता"
आत्म्याने परिपूर्ण व्हा !
हे कोणासाठी आहे ?
विश्वासणाऱ्याने आत्म्याने पूर्ण व्हावे ही देवाची योजना व तरतूद आहे . ती सर्वांसाठी आहे
(फक्त सर्व नव्याने जन्मलेल्या विश्वासणाऱ्यासाठी आहे.)
ती फक्त देवाच्या सेवकांसाठी ,
संदेश्ट्यां साठी , पाळकांसाठी चर्च लिडर्ससाठी किंवा फक्त सुवार्तिकासाठी
नाही.
पण देवाच्या प्रत्येक लेकरांसाठी आहे .
( प्रेषित २ : ४ Comp. प्रे.२:३९)
"कारण ते वचन तुम्हास व तुमच्या मुलाबाळांस आणि जे दूर आहे त्या सर्वांस म्हणजे जितक्यास प्रभू आमचा देव आपणाकडे बोलावील तितक्यास दिले आहे ."
(योएल २:२८)
" मी आपला आत्मा सर्व देहांवर ओतून
देईन . "
आत्म्याने परिपूर्ण कसे व्हावे ?
१ ) प्रेषित २ : ३७-३८
पश्चाताप , विश्वास , नवाजन्म याद्वारे.
"तेव्हा त्यांना आपल्या अंतःकरणात टोचणी लागली तेव्हा ते पेत्राला आणि इतर प्रेषितांस म्हणाले , अहो भावांनो आम्ही काय करावे ?
मग पेत्र त्यांना म्हणाला , पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने येशू
ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा ; मग पवित्र आत्म्याचे दान पावाल ."
२) लेवीय , १४ : १४-१७
कुष्ठरोग्याचे शुद्धिकरण
वचन १४.
"मग याजकाने दोषार्पणाच्या रक्तातुन काही घ्यावे आणि याजकाने ते शुद्ध होणाऱ्याच्या उजव्या कानाच्या टोकाला व त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला व त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे . "
वचन १५
"मग याजकाने ते लोगभर तेल घेऊन
त्यातले काही तेल आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर ओतावे ."
वचन १६
"मग याजकाने आपल्या डाव्या हातामध्ये असलेल्या तेलात आपल्या उजव्या हाताचे बोट बुचकळून त्या तेलातले काही तेल शुद्ध होणाऱ्याच्या उजव्या कानाच्या टोकाला आणि उजव्या हाताच्या अंगठ्यात आणि त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला ; दोषार्पणाच्या रक्तात लाव ."
या चित्राचा आत्मिक अर्थ काय आहे ?
१ ) कुष्ठरोग = पापाचे प्रतीक आहे .
तो फैलावणारा आहे .
तो ओंगळ आहे .
तो विद्रुप बनवणारा आहे .
तो लवकर बरा होणारा नाही .
तशीच स्थिती पापाची आहे .
२ ) कुष्ठरोगी मनुष्य = पापी किंवा पापात जगत असलेल्या मनुष्याचे चित्र आहे . =
३ ) शुद्ध करणारा = प्रभू येशू ख्रिस्ताचा दर्शक आहे .
४ ) दोषार्पणाच्या कोकऱ्याचे रक्त = प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे दर्शक आहे तो प्रभू आमच्या पापामुळे मारला गेला .
५ ) रक्त कानावर हाताच्या अंगठ्यावर पायाच्या अंगठ्यावर लावणे : येशूच्या रक्ताद्वारे , विचार , कृती चालणे शुद्ध झाल्याचे ते चित्र आहे .
६ ) तेल कानावर हाताच्या अंगठ्यावर पायाच्या अंगठ्यावर लावणे = पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचे ते चित्र आहे .
निरीक्षण करा : प्रथम रक्त व नंतर तेल
प्रथम येशूच्या रक्ताद्वारे शुद्धी व तारण नंतरच अभिषेक .
क्रम फार महत्त्वाचा आहे .
तसेच फक्त नव्याने जन्म झालेल्या लोकांसाठीच आत्म्याच्या अभिषेक व पूर्णता आहे .
३ ) यशया ४४ : ३
पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी तहान व रिक्तता असणे हे फार महत्त्वाचे आहे.
"कारण मी तान्हेल्यावर पाणी आणि सुक्या भूमीवर प्रवाह ओतीन ." तुझ्या
संततीवर मी आपला आत्मा आणि तुझ्या संतानावर मी आपल आशिर्वाद ओतीन ,"
४) स्तोत्र . ५१:१७
"हे देवा भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस ."
( प्रेषित . ९ : ५)
Denial of Self / Surrender
३ ) मार्क ११:२४
विश्वास ठेवा
"म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही
प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल ."
४ ) लुक . ११:१३
प्रार्थना, मागणी,
"तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल ?"
५) प्रेषित १ : ४
प्रभू विश्वास ठेवून वाट पाहणे
"आणि ते एकत्र जमले असता त्यांच्याशी मिळून त्याने त्यांना आज्ञा केली की , यरुशलेमेतून निघून जाऊ नका , परंतु जे बापाचे वचन तुम्ही माझ्यापासुन ऐकले आहे त्याची वाट पाहा ."
वचन ५
"परंतु आतापासून फार दिवस झाले नाही तो पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा होईल ."
प्रेषित ४:३१
"आणि प्रार्थना केल्यावर .... ते सर्व
पवित्र आत्मा पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले . पवित्र आत्मा कधी मिळतो ?"
इफिस १:१३
तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यावर नंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे .
वचन १४ खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या
वतनाचा विसार आहे . रोम . ८ : ९
जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही .
गलती ३ : २ = by hearing of faith
गलती . ४ : ६
१ करींथ . ३:१६
जेव्हा नवा जन्म होतो तेव्हाच पवित्र आत्मा वसती करण्यासाठी विश्वासणाऱ्यामध्ये येतो .
It is called Indwelling of the
Holy Spirit in the beliver
वसती करणारा पवित्र आत्मा व आत्म्याने परिपूर्ण होणे एकच आहे का ?
उत्तर : नाही .
सर्वच विश्वासणाऱ्या नवा जन्म पावलेल्या देवाच्या लोकांमध्ये पवित्र आत्म्याची वसती असते . पण सर्वच जण आत्म्याने परिपूर्ण नसतात .
It is one thing to have the Holy Spirit residing within us - But it is another thing to have Him
presiding within us .
नवा जन्म आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा यांत फरक आहे काय ?
उत्तर : होय .
नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात जाता येत नाही .
( योहान . ३ : ५ )
नवा जन्म हा तारणासाठी आवश्यक असतो .पण,
पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा हा आत्मिक सामर्थ्यासाठी आवश्यक
असतो .
प्रेषित १ : ८
"पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात व
शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल ."
पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा मुख्यतः सेवेसाठी आवश्यक आहे .
चिन्हे व प्रतिके व सत्य :
नव्या जन्माची vs पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची चिन्हे आणि प्रतीके यांची तुलना:
१. विहीरीचे प्रतीक
(योहान . ४:१४)
"परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”
या ठिकाणी उल्लेख केलेले पाणी हे
नवीन जन्माच्या वेळेस मिळणाऱ्या पवित्र आत्म्याचे दर्शक आहे.
नदीच्या पाण्याचे प्रतीक
(योहान ७:३८)
"जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” (ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.)
(योहान 7:38-39)
या ठिकाणी वर्णन केलेले नदीचे विपुल व मुबलक पाणी हे पवित्र आत्म्याच्या अपरिमित, महान सामर्थ्यशाली बाप्तिस्म्याचे दर्शक आहे. येशूच्या गौरवानंतर म्हणजेच त्याच्या पुनरुत्थानानंतर मिळणाऱ्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचेते दर्शक होते.
२. नामान कोड्यालाआलेल्या नवीन त्वचेचे प्रतीक
२ राजे ५:१४
या ठिकाणी वर्णन केलेली नामानाला
आलेली नवीन त्वचा ही नव्या जन्माच्या वेळेस मिळणाऱ्या नव्या स्वभावाची दर्शक आहे.
अलिशाला मिळालेला एलीयाचा झगा
(२ राजे २:१३ वचन ९,१४)
अलिशा या ठिकाणी विश्वासणारा किंवा मंडळीचा दर्शक आहे. एलीयाचा झगा हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा दर्शक आहे.
३. येशूचा जन्म
लुक . १:३५
येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्म्याच्याद्वारे झालेला जन्म हा विश्वासणाऱ्याच्या नव्या जन्माचा पॅटर्न किंवा नमुना आहे.
विश्वासणाऱ्याचा नवा जन्म देखील पवित्र आत्म्याच्या द्वारेच होते.
प्रभू येशूचा बाप्तिस्मा
(लुक ३:२-२२)
आपल्या प्रभुने बाप्तिस्म्यानंतर सामर्थ्याची अद्भुत कृत्य करण्यास प्रारंभ केला. शिष्यांना पेंटीकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्यांच्याकडून पवित्र आत्म्याद्वारे महान अद्भुत सामर्थ्याची कृत्ये झालेली दृष्टीस पडते.
४. तेलात मळलेल्या सपीठाच्या बेखमीर पोळ्या
(Mingling of oil)
(भट्टीत भाजलेले अन्नार्पण)
लेवीय २ : ४
अन्नार्पणात तेलात मळलेल्या पोळ्यांचा उल्लेख आलेला आहे.
अन्नार्पण हे येशू ख्रिस्ताचे दर्शक आहे .
अन्नार्पणातील पांढरे शुभ्र सपीठ हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र व शुद्ध जीवनाचे प्रतीक आहे.
(प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःची तुलना गव्हाच्या दाण्याशी व भाकरीशी केलेली आहे)
पीठ मळताना वापरलेले तेल हे पवित्र आत्म्याचे दर्शक आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होताना त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला असे पवित्र शास्त्र सांगते.
अगदी तशाच प्रकारे विश्वासणाऱ्याच्या नवीन जन्म पवित्र आत्म्याद्वारे होतो.
वरून तेल ओतलेले, तव्यावर भाजलेले अर्पण
(लेविय २:६)
"त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय."
ओतलेले तेल हे ओतल्या गेलेल्या पवित्र आत्म्याचे म्हणजेच पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचे दर्शक आहे.
५. वल्हांडण सण
निर्गम १२:१-२७
वल्हांडण सण हा पिकांच्या कापणीची सुरुवात होती. पण पेंटीकॉस्टचा सण हा पिकांच्या हंगामाचा उच्चांक होता. नव्या जन्माच्या वेळेस आत्मिक जीवनाची
सुरुवात होते.
पेंटिकॉस्टचा सण
लेवीय २३:१५
"शब्बाथानंतरच्या दुसर्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुरे सात शब्बाथ मोजावेत; सातव्या शब्बाथाच्या दुसर्या दिवसापर्यंत पन्नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ नवे अन्नार्पण करावे."
नव्या जन्माच्या वेळेस पवित्र आत्मा वस्ती करण्यासाठी येतो. परंतु
पेंटीकॉस्ट किंवा पवित्र आत्म्याचा
बाप्तिस्मा झाल्यावर पवित्र आत्म्याचे महान सामर्थ्य प्रगट झालेले दिसते.
६. कुष्ठरोग्यावर अभिषेक
लेवीय १४:१५-१८
"याजकाने लोगभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे; मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले थोडे परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे. त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले थोडे घेऊन याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या
अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे; याजकाच्या तळहातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे."
पापरुपी कुष्ठरोगातून बाहेर पडल्यावर बऱ्या झालेल्या कुष्ठरोग्याला करण्यात येणारा अभिषेक .
बऱ्या झालेल्या कुष्ठरोग्याला करण्यात येणाऱ्या तेलाचा अभिषेक हा नवीन जन्माच्या वेळेला पश्चातापी व शुद्ध झालेल्या व्यक्तीला मिळणाऱ्या
पवित्रात्म्याचे दर्शक आहे.
याजकीय व राजकीय अभिषेक
निर्गम १९:६
"पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्राएल लोकांना सांग.”
१ शमुवेल १६:१३
"मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल
उठून रामास गेला."
१ पेत्र २:९ "पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत."
याजकीय व राजकीय अभिषेक
(Priestly and Kingly Anointing)
हा आम्हाला आत्मिक विजयातून विजयाकडे नेत असतो. विजयी ख्रिस्ती
जीवन जगण्यासाठी सहाय्य करतो.
७. येशूच्या शिष्यांवर पुनरुत्थित येशू ख्रिस्ताची फुंकर
योहान २०:२२
वारा पवित्र आत्म्याचा दर्शक आहे .
प्रभू येशूने शिष्यांवर घातलेली फुंकर ही नव्या जन्माच्या वेळेला मिळणाऱ्या पवित्र आत्म्याची दर्शक आहे.
परंतु पेंटीकॉस्टच्या वेळेला अग्नीच्या जिव्हाच्या स्वरूपात मिळालेला पवित्र आत्मा हा पवित्र आत्म्याच्या बाप्तीसम्याचा दर्शक आहे.
८. नव्या जन्माचा उद्देश तारण प्राप्ती आहे. नव्या जन्माच्याद्वारे आपण ख्रिस्ताच्या अदृश्य शरीराचे अवयव बनतो व ख्रिस्ताच्या शरीराला जोडले जातो. हा ख्रिस्ताच्या शरीरातील बाबतीत आहे.
(१ करींथ १२:१३)
पवित्र आत्म्याच्या बाप्तीस्म्याचा एक मुख्य उद्देश देवाच्या कार्यासाठी विश्वासणाऱ्याला सामर्थ्य देणे हा आहे.
हा पवित्र आत्म्यातील बाप्तिस्मा आहे.
(प्रेषित १:५, मत्तय ३:५)
नवा जन्म व पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा काही वेळेस एकाच वेळेस होतो
तर काही वेळेस वेगवेगळ्या वेळी झालेला आढळतो उदाहरण :
१. शोमरोनी नव - विश्वासणारे (Samaria )
प्रेषित . ८ : १४-१७
• ते विश्वासणारे होते वचन १४
• त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला होता वचन १६
♦ परंतु पवित्र आत्मा त्यांच्यावर आला नव्हता . वचन १६
• प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवल्यावर पवित्र आत्मा त्यांना मिळाला वचन १७
२. यरुशलेम येथील येशूचे शिष्य
प्रेषित २
♦ पेत्र ‘ भावांच्या ' मध्ये उभा राहून म्हणाला = All belivers
( प्रेषित , १:१५ )
♦ तुम्ही सर्व शुद्ध आहात शिवाय एक = (योहान . १३:१०)
● पवित्र आत्म्याची फुंकर मिळाली होती . (योहान , २०:२२)
♦ पन्नासाव्या दिवशी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा = (प्रेषित २ : ४ ) ( वेगवेगळ्या वेळी २ घटना )
नवा जन्म व पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा एकाचवेळी घडला याची उदाहरणे :
३. इफिस येथील घटना
(प्रेषित . १ ९ : १-७)
• त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता वचन ३
• योहानाचा बाप्तिस्मा फक्त पश्चातापासाठी होता.
( प्रेषित . १ ९ : ४ )
• मग त्यानी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला ( येशूला स्विकारले ) वचन ५
● पौलाने त्यांच्यावर हात ठेवले व पवित्र आत्मा त्यांच्यावर आला . वचन ६
४. कैसेरीया येथे कर्नेल्य याच्या घरी
• नवा जन्म व पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा एकाच वेळी
(प्रेषित १० : ४४-४५)
• नंतर पाण्याचा बाप्तिस्मा झाला .
• शोमरोनातील शिष्यांस पाण्याच्या बाप्तिस्म्यानंतर काही काळाने पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला
( प्रेषित ८ : १६-१७ )
• कैसेरीया येथे कर्नेल्याच्या घरी
पाण्याचा बाप्तिस्म्या अगोदर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा विश्वास ठेवलेल्यांना मिळाला .
यावरून एक गोष्ट निश्चित होते की, देवाच्या इच्छेनुसार नवा जन्म व पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होत असतो.
♦ नवा जन्म वचन + आत्म्याद्वारे
( तित , ३ : ५ , योहान ३ : ५ )
• हात ठेवण्याने नवा जन्म कधीही होत नाही .
• पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्रेषितांच्या
हात ठेवण्याने देखील झाला .
• नव्या जन्मामध्ये जीवनाचे ( life ) वाटप होते .
● पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यात सामर्थ्याचे वाटप होते .
शलमोनाचे मंदीर :
१ ) मंदीर देवाच्या तेजाने भरून जाते .
(२ इति . ७ : १-३)
देवाचे मंदीर देवाच्या तेजाने देवाच्या
उपस्थितीने भरून जावे हि देवाची इच्छा आहे .
२ ) तुमचे शरीर , तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदीर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय ?
(१ करिंथ . ६ : १ ९)
३ ) शलमोनाचे मंदीर देवाच्या तेजाने भरुन गेले . आज आपले शरीर देवाचे मंदीर आहे. आपण पवित्र आत्म्याने भरावे ही देवाची इच्छा आहे .
(इफिस . ५:१८)
" आत्म्याने परिपूर्ण व्हा "
प्रभू येशूची शांती तुम्हासह असो.
आमेन.
God bless you.
रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे
Yorumlar