top of page
Search
Writer's pictureRajkumar Kore

पापाच्या भरपाईचे प्रतीकात्मक चित्रीकरण



पापाच्या भरपाईचे प्रतीकात्मक चित्रीकरण

Sermon by Rev.Dr. Rajkumar Kore

(Sermon in2018)


(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)

(For video on this topic, please click on this link: https://goo.gl/ao661Q)


आणखीन एक महत्वाचा धागा, एक रहस्य उत्पत्तीच्या पुस्तकात दिलेले आहे. पाप झाल्यानंतर आदाम व हवेनेन स्वतःला अंजिराच्या पानांनी स्वःताला झाकले. याच्यावरून प्रभू आपल्याला हे दाखवत आहे की, पाप मनुष्याला उघडे करते. पाप हे किती भयानक आहे. मनुष्य आपले पाप झाकण्यासाठी पाने शिवत बसतो. ही पाने जी आहेत हे आमची स्वतःची नीतीची कृत्ये आहेत. मनुष्याला असे वाटते की, मी चांगले वागीन म्हणजे माझे पाप धुतले जाईल, पापांपासून मी मुक्त होईन. पापामुळे माझी झालेली अवस्था, माझी जी लज्जा ती झाकली जाईल असे मनुष्याला वाटते. पण परिस्थिती काय सांगते ? त्या पाप केलेल्या अवस्थेमध्ये देखील देव माणसावरती प्रीती करीत आहे. किती सुंदर, किती चांगला देव आहे आपला. त्याने एक सुंदरशी घटना केलेली आहे, आदाम व हवेला त्याने चर्म वस्त्रे कटीवेष्टने म्हणून दिलेली आहे.


देव या कृतीच्याद्वारे एक गोष्ट प्रकट करीत आहे की, मनुष्याचे पाप हे मनुष्याच्या नीतीच्या कृत्याने झाकले जाऊ शकत नाही, त्यासाठी देवापासूनच काही उपाय योजना व्हावी लागेल. देव ही उपाय योजना करणार होत. त्याने दुसऱ्या कोणत्यातरी झाडाची पाने शिवून आदाम व हवेला का नाही दिली ? चर्म वस्त्रे मिळवण्यासाठी एखाद्या प्राण्याचे रक्त सांडावे लागते. चामडी कशी मिळतात माहिती आहे ना ? कोणीतरी मरावे लागते, आणि तो प्राणी किंवा तो पशु मरण पावल्यानंतर त्यापासून ती चर्मवस्त्रे तयार होऊ शकतात. देव हे सांगत होता की, या पापाची किंमत कोणाला तरी मोजावी लागणार आहे. त्यासाठी कोणाचा तरी मृत्यू होणे आवश्यक आहे आणि देवापासून ही वस्त्रे मिळणे आवश्यक आहे.


कारण देवाचे जे निकष आहेत ते अति उच्च आहेत. कदाचित आपण ही पापे करू आणि थोडी चांगली कृत्ये करू आणि म्हणू आज मी खूप चांगले वागलो, कारण आम्ही त्या दोन नीतीच्या कृत्यांकडे आपले लक्ष लावतो. पण आमच्या हातून तर पहिलेच काही पापे झालेली असतात. देवाला Black and White combination चालत नाही. देवाला १०० % नितीकृत्ये यहिजे असतात . आपले निकष आणि देवाचे निकष याच्यामध्ये फार फरक आहे. देवाच्या दृष्टीकोनातून आपण जेव्हा आपले स्वतःचे परीक्षण करतो तेव्हा, आम्ही अशा प्रकारे म्हणतो “ हाय हाय !! माझे काय होणार, मी तर अशुद्ध ओठांचा, अशुद्ध लोकांत राहतो.” तेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात जो कोणी येतो त्याला आपले पाप दिसते. तो पर्यंत त्याला त्याचे पाप दिसत नाही. आपण पाहतो की, देव या ठिकाणी ते चर्मवस्त्र देत असताना ही भविष्यवाणी करीत आहे “कोणाचे तरी रक्त सांडले जाणार आहे, कोणाचा तरी मृत्यू होणार आहे आणि त्याद्वारे तुमची पातके झाकली जाणार आहे.” हा दुसरा कोणी नसून देवाचा पुत्र जो युगाच्या स्थापनेपूर्वी वधिला गेला होता. ही जी योजना होती ती युगाच्या स्थापने पूर्वी झाली होती ती तो (येशू) अमलात आणणार होता आणि म्हणून पहिले प्रतीकात्मक भविष्य आपण पाहतो की, चर्म वस्त्रांच्याद्वारे येशू ख्रिस्त काय कार्य करणार आहे हे आम्हाला प्रतीकात्मकरीत्या सांगत आहे.


मग पुढे आपण जेव्हा लेवीय मध्ये येतो तेव्हा शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या आत्म्यासाठी वेदीवर सांडण्यासाठी “मी ते तुम्हाला दिले आहे” असे देव स्वतः म्हणत आहे. देव वेदीवरती सांडण्यासाठी जे रक्त पुरवठा करणार होता ते म्हणजे येशू ख्रिस्ताचे रक्त. वधस्तंभावरती खिळला गेलेल्या येशू ख्रिस्ताचे रक्त हे तुमचे आणि माझी पापे धुण्यास समर्थ ठरणार होते.

God bless you.


Rev. Dr. Rajkumar Kore.



119 views0 comments

Comments


bottom of page