लेविय पुस्तकाची सुरुवात !!!
Sermon by Rev. Dr. Rajkumar Kore
(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)
(For Video please CLICK here : https://goo.gl/BFpxxm)
आपण लेवीय याचा पहिला अध्याय आणि पाहिलं वचन बघू. “आणि यहोवा मोशेला हाक मारून सभा मंडपातून त्यांच्याशी बोलला. ” तुमचे लक्ष एका फार महत्वाच्या गोष्टीकडे वेधायचे आहे. पहिल्या वचनाकडे फक्त लक्ष द्या. येथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की, या पुस्तकाची सुरुवात “आणि” ने झाली आहे. लेवीय पुस्तकातील पहिल्या अध्यायातील पहिल्या वचनाची सुरुवात “आणि” या शब्दाने झाली आहे. “आणि” हा शब्द आपण मराठी भाषेमध्ये का वापरतो? दोन गोष्टींना जोडणारा तो शब्द आहे. आता या ठिकाणी देवाला काय सांगायचे आहे ? कोणत्या दोन गोष्टींना जोडायचे आहे? तर येथे नुकतेच निर्गमचे पुस्तक संपलेले आहे आणि लेवीयचे पुस्तक सुरु झालेले आहे. तर निर्गमशी लेवीयचा मोठा संबंध आहे हे देव आपल्याला सांगत आहे. निर्गम पुस्तक हे त्या ठिकाणी संपलेले नाही. निर्गमचा पुढचा जो परिणाम आहे तो लेवीय पुस्तकात दाखवलेला आहे. निर्गम मध्ये काय होते हे समजण्यासाठी फार महत्वाचे आहे. कारण पवित्र शास्त्र हे एकसंध आहे. बरेचशे लोक येथून एक वचन घेतात, तेथून एक वचन घेतात आणि त्याच्यावरती आपली Theology तयार करतात, आपला गट तयार करतात. त्यामुळे Cult मध्ये (पाखंडी मतामध्ये) त्याचे रुपांतर होते. जर पाखंड वादापासून दूर रहायचे असेल तर संपूर्ण शास्त्र अगदी उत्पत्ती पासून प्रकटीकरणापर्यंत अभ्यासणे हे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला लोक स्वतःला सोईस्कर अशी बायबल मधून वचने शोधून काढतात आणि म्हणतात “बायबल मध्ये लिहिले आहे ना….” असा बायबलचा reference देऊन आपल्यापुरते तसे जीवन बनवतात. हे चुकीचे आहे. संपूर्ण शास्त्रलेख आपण अभ्यासला पाहिजे.
निर्गम मध्ये काय सांगितले आहे ? तीन महत्वाच्या गोष्टी आहेत निर्गम मध्ये.
१. मिसरातून इस्राएल लोकांची सुटका. फारोच्या गुलामगीरीतून देवाने इस्राएल लोकांना कसे बाहेर काढले हा सर्वात महत्वाचा भाग आपल्याला निर्गम पुस्तकात आढळतो.
२. बाहेर काढल्यानंतर ते ज्यावेळेस रानात येतात त्यावेळेला आपण पाहतो की, रानामध्ये निवास मंडपाची रचना देवाने इस्राएल लोकांना करायला लावली आहे आणि त्या निवास मंडपात कशा प्रकारे ती रचना असावी, त्याच्यात कोणत्या वस्तू असाव्यात या सर्व गोष्टींच्याबद्दल जी माहिती आहे ती निर्गमच्या पुस्तकामध्ये आपल्याला प्रमुख्याने आढळेल.
३. पवित्र देवाची समक्षता Shekinah Glory म्हणजे देवाचे गौरव त्या निवास मंडपावरती उतरून आले होते. देव त्या ठिकाणी वस्तीसाठी उतरून आला होता असे शास्त्र सांगते. निवास मंडपाचे नावच निवास मंडप यासाठी ठेवले की, देव तो उद्देश सांगत आहे यासाठी की, “माझी त्यांच्यामध्ये वस्ती व्हावी.” देवाला आमच्यामध्ये रहायला आवडते. त्याचे नावच Emanuel आहे. या नावाचा अर्थ काय आहे ? आम्हा संगती देव. त्याला आपल्यामध्ये रहायला आवडते. तो म्हणतो पहा मी दाराशी ठोकत आहे, जो कोणी दार उघडेल, मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन. देव हा सहवास प्रिय आहे. देवाने तुमची आणि माझी जी निर्मिती आहे ती सहभागीतेसाठीच केलेली आहे. आम्ही सदासर्वकाळ त्याच्या सहभागीतेत असावे हा त्याचा उत्तम उद्देश मनुष्य निर्मिती मागे होता. तर येथे निवास मंडपाच्या द्वारे परमेश्वर हे दाखवत आहे की, देवाला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये रस आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या हृदयाचे दार उघडूया.
लेविय पुस्तकाची रचना कधी होते ?
लेवीय पुस्तकाची रचना केलेली आपल्याला आढळते. कशा नंतर ? मिसरातून सुटका झाल्या नंतर. आता हे आत्मिक जीवनाला चित्र लागू करा की, मिसर, फारो, आणि मिसरामध्ये गुलाम असलेले जे लोक आहे हे एक सुंदर प्रतीकात्मक चित्र आहे. मिसर हे या जगाचे दर्शक आहे, फारो हा सैतानाचे दर्शक आहे आणि फारोने इस्राएल लोकांना जसे गुलामगिरीत ठेवले होते, तसेच सैतानाने पापाच्या द्वारे मनुष्याला गुलाम बनवले होते. देवाने ज्या प्रमाणे मोशेला आपल्या लोकांना त्या बंदिवासातून बाहेर काढण्यासाठी मोशेला पाठवले; तसेच तुम्हाला आणि मला पापातून बाहेर काढण्यासाठी देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला मोशे प्रमाणे या जगात पाठवले. त्याने आपल्याला बाहेर काढल्यानंतर आपण पाहतो, निवास मंडप मिसरामध्ये नाही. निवास मंडप कोठे आहे ? अरण्यात आहे, रानात आहे. तांबडा समुद्र पार केल्यानंतर निवास मंडप दिला जातो. तुमच्या जीवनामध्ये जर देवाची वस्ती व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला पहिले मिसरातून बाहेर पडावे लागेल. मिसर हे जगिक जीवनाचे दर्शक आहे हे आपणाला माहीतच आहे, जो पर्यंत आम्ही जगिक जीवनामध्ये इतरांच्या सारखे जीवन जगतो तो पर्यंत आमच्या जीवनात निवास मंडप तयार होत नाही आणि देवाची गौरवी समक्षता आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रकट झालेली, किंवा इतरांना प्रकट झालेली दिसून येत नाही. म्हणून पापातून सुटका झाल्यानंतर आमचे जीवन, आमचे हृदय हे देवाचे निवास मंडप बनल्यानंतर आणि देवाची गौरवी समक्षता निवास मंडपात आल्यानंतर आपण जे आमच्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याची वस्ती झालेयनंतर लेवीय पुस्तकाची सुरुवात होते.
God Bless You.
Rev.Dr. Rajkumar Kore.
댓글