top of page
Search
Writer's pictureRajkumar Kore

लेवीय – देवाला होमार्पण सादर करणे गहन अर्थ


Attribute :Marian van der Kruijt https://www.freebibleimages.org/



लेवीय – देवाला होमार्पण सादर करणे

Sermon By: Rev.Dr. Rajkumar Kore


(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)


(For Video click here: https://goo.gl/xNTv4i )


Hitting the mark and Missing the mark. एखादे लक्ष्य आहे, त्या लक्ष्यापर्यंत आपला बाण पोचत नाही. बाण अलीकडेच पडतो, कमी पडतो. देवाने सांगितलेल्या गोष्टी करण्यापर्यंत आमची धाव जात नाही. आम्ही कमी पडतो. सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत, कमी पडले आहेत किंवा अंतरले आहेत. याचाच अर्थ आहे Missing the mark. हे जे Missing the mark होते की, ‘देवाला संतोष देणे’ हे आमचे ध्येय होते. देवाचा उद्देश मुळी मनुष्याला निर्माण करण्यामागे हा होता की, देवाला आम्ही संतोष द्यावा. आपण देवाला कसा संतोष देऊ शकतो ? तर देवाची इच्छा पूर्ण करून. परंतु आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग पकडला होता आम्ही आमच्या इच्छेनेच चालत होतो.


शास्त्यांच्या काळात काय स्थिती होती हे रुथ या पुस्तकाच्या अध्यायात आपल्याला पहायला मिळते. या काळात, शास्त्यांच्या आमदानीत एक मनुष्य होता. त्याचे नाव होते “अलीमलेख “. याचा अर्थ “माझा देव माझा राजा आहे”. त्याच्या पत्नीचे नाव “नामी” म्हणजे मनोरम असे होते. ज्यावेळेला आमचे जीवन असे होते की, “माझा देव हा माझा राजा आहे, त्यावेळेला आमचे जीवन हे नामी ने भरून जाते, म्हणजे मनोरम गोष्टीने भरून जाते”. पण हे कधी घडले, तर, शास्त्यांच्या आमदानीत. या शास्त्यांच्या आमदानीचे काय वैशिष्ट्ये होते ? शास्त्यांच्या पुस्तकातील शेवटच्या अध्यायातील शेवटच्या वचनांत असे लिहिले आहे की, “त्यावेळेला इस्राएलावर कोणी राजा नव्हता आणि ज्याला जसे बरे वाटे तसे तो वागत असे”. म्हणजे इस्राएलावरती कोणी राजा नव्हता म्हणजे इस्राएलाचे लोक देवाला आपला राजा मानीत नव्हते आणि प्रत्येकजण आपल्या मनाचे राजे झाले होते. ज्याला जसे बरे वाटायचे तसे तो करीत होता. स्वतःची इच्छा पूर्णतेला नेत होता. ज्यावेळेला आम्ही स्वतःची इच्छा पूर्णतेला नेतो व देवाची इच्छा पूर्ण करीत नाही त्यावेळेला आम्ही त्याच्या गौरवाला कमी पडतो. आम्ही देवाला गौरव देण्यामध्ये कमी पडतो आमी मग आम्हाला गरज पडते ती होमार्पणाची.


आम्ही कमी पडलेलो आहो आणि कमी पडणे देखील हे एक पाप आहे आणि या पापाबद्दल प्रायश्चित्त कोण देणार ? आमची ही कमी कोण भरून काढणार ? त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून आपल्यासाठी आला. तो म्हणतो ‘हा मी आलो आहे’. पित्याची इचा पूर्ण करायला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ‘आमची कमीघटी कमी करायला’. उदारणार्थ एखादा जर आजार झाला, कधी कधी आपण म्हणतो Anaemia झाला. रक्ताची कमतरता आहे, Iron कमी आहे. Deficiency झाली आहे असे आपण म्हणतो. ही जी Deficiency आपल्यामध्ये होती, ही Deficiency आत्मिक रित्या हे एक पाप आहे आणि या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी म्हणजे ही Deficiency भरून काढण्यासाठी प्रभू आला ‘होमार्पण’ बनून.


आता त्याच्यामुळे आम्ही देवाला होमार्पण करू शकतो. बंधुजनहो, देवाच्या करुणामुळे मी तुम्हांस विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला प्रिय अशी यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची अध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समर्पित होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या. प्रभू येशू म्हणतो की, ‘जो कोणी माझा अनुयायी होऊ इच्छितो त्याने स्वतःचा नाकार करावा (कारण येशू ख्रिस्ताने होमार्पण करताना प्रथम स्वतःचा नाकार केला, स्वताच्या इच्छेचा नाकार केला) आणि आपला वधस्थंभ घेतला, पुढे गेला आणि तोच मार्ग तुम्हाला आणि मला म्हणजे विश्वासणाऱ्याला करायचा आहे, जो प्रभूने केलेला आहे. स्वतःचा नाकार करायचा आहे, आपला वधस्थंभ घ्यायचा आहे आणि प्रभूच्या मागे चालायचे आहे. तेव्हाच देवाला सुवासिक असे हव्य होमार्पण आमच्याकडून देवाला सादर केले जाईल.

God bless you.


Dr.Rajkumar Kore.




77 views0 comments

Comments


bottom of page