यहोवा व एलोहिम यांचा अर्थ आणि वापर
(For Video please click on this link: https://goo.gl/zBTcc1)
Sermon By: Rev.Dr. Rajkumar Kore
(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)
“आणि” हा शब्द आपण पाहिला की, “आणि यहोवा मोशेला हाक मारून बोलला.” आता यहोवा हा शब्द पंडिता रामाबाई यांनी Original भाषेतून जसाचा तसा वापरलेला आहे. मराठीमध्ये त्याचे भाषांतर “परमेश्वर” असे केलेलं आहे परंतु मुळ शब्द यहोवा आहे. आता पवित्र शास्त्रात उत्पत्ती मध्ये आपल्याला दोन शब्द प्रकर्शाने आढळून येतील आणि ते म्हणजे एलोहीम आणि यहोवा. “प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली” “देवाने” हे जे भाषांतर आहे, “देव” हा शब्द “एलोहीम” या शब्दाचे भाषांतर आहे. परंतु “परमेश्वर देव” असा जेव्हा शब्द येतो तेव्हा “यहोवा एलोहीम” असा मूळ शब्द आहे. आता हे दोन शब्द उगाच मनाला आले तेव्हा एलोहीम वापरला आणि मनाला आले तेव्हा यहोवा हा शब्द वापरला असे मुळीच नाहीये. ह्याच्यात काय मर्म आहे हे आपण आता पाहू या.
पृथ्वी स्थापनेच्या वेळेस, आकाश निर्मितीच्या वेळेस उत्पत्ती १: १ च्या वेळेस देव हा यहोवा शब्द वापरत नाहीये. प्रारंभी “यहोवा” ने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली असे देव वापरत नाहीये. प्रारंभी “देवाने” आकाश आणि पृथ्वी निर्माण केली असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. देव किंवा “एलोहीम” या शब्दाचा मूळ अर्थ “सामर्थ्यवान” El Shaddai – Almighty असा आहे. तेव्हा “देव” हा शब्द देवाच्या सामर्थ्याशी निगडीत आहे. परंतु “यहोवा” हा शब्द जो आहे ज्यावेळेस मोशे त्या झुडपातून देवाला बोलताना पाहत आहे, त्यावेळेला तो म्हणतो (मोशे विचारतो) की, मी माझ्या लोकांना काय सांगू ? कोणी मला पाठवले ? त्यावेळेला परमेश्वर उत्तर देतो “मी जो आहे तो आहे, याने मला पाठवले असे तू सांग.” त्यासाठी हिब्रू शब्द जो वापरला आहे तो आहे “यहोवा.” यहोवाने मला पाठवलंय असे तू सांग. “यहोवा” हे त्याचे Personal Name आहे.
वैयक्तिक नाव. आपल्या देवाचे नाव काय आहे असे जर कोणी विचारले – तर आपल्या देवाचे वैयक्तिक नाव “याहोवा” आहे आणि “याहोवा देव” या शब्दाचा अर्थ या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे “मी जो आहे तो आहे”. म्हणजेच TO BE या शब्दाचे भाषांतर आहे, की, सतत असणारा. त्या शब्दाच्या पाठीमागे Eternity – “सनातनत्व” हे आपल्या लक्षात येते. आपल्या लोकांना कोणते नाव सांग असे परमेश्वर म्हणतो ? एलोहीम नाव नाही सांगत तो, “यहोवा” ने मला पाठवले असे तो सांगतो. म्हणजे त्या ठिकाणी व्यक्तिगत नाते Personal Relationship आपल्या लोकांच्या बरोबर तो दर्शवित आहे. ज्या वेळेला वैयक्तिक नाते किंवा वैयक्तिक करार या विषयी देव बोलत असतो त्यावेळेला तो “यहोवा” शब्द वापरतो. इस्राएल लोकांना त्याने स्वतःची प्रजा म्हणून निवडून घेतले होते. इस्राएल लोकांमध्ये आणि देवामध्ये कराराचे नाते होते, Covenant relationship.
त्या ठिकाणी आपण पाहतो की, आता संबंध आहे उपासनेचा. लेवीय पुस्तकात उपासनेबद्दल देव सांगणार आहे. ही उपासना कोणाची करायची ? तर वैयक्तिक नाते असलेल्या देवाची करायची. ज्याच्याशी तुमचे नाते नाही त्याची उपासना करायला देव सांगत नाही. विधर्मी लोकांनी केलेली उपासना देव स्वीकारून घेणार नाही. देवाची उपासना करण्यासाठी आधी देवाचे याजक व्हावे लागते. ज्यांचा नव्याने जन्म झालेला आहे त्या नव्याने जन्म झालेल्या व्यक्तीलाच जिवंत देवाची उपासना करण्याचे Privilege – विशेष अधिकार देण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण पाहतो की यासाठी देवाने “यहोवा” हा शब्द वापरला.
काही लोकांनी, जे स्वतःला शहाणे समजतात, १८०० सालात एक नवीन Tomb काढली. काय Tomb काढली ? एक Theory काढली – पवित्र शास्त्रात काही ठिकाणी “एलोहीम” शब्द आहे काही ठिकाणी “यहोवा” शब्द आहे काही गोष्टी पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत – याचा अर्थ पवित्र शास्त्र देवाकडून Direct मिळाले नाही. हे जे तोंडी संप्रदाय होते त्यामधील काही लोकांनी काही Stories आणल्या त्या शास्त्राला जोडल्या, दुसऱ्या काही लोकांनी काही Stories आणल्या, म्हणजे यहोवाच्या नावाची उपासना करणारे जे आहेत त्यांनी काही त्यांच्या Stories बायबल मध्ये जोडल्या व एलोहीम नावाची उपासना करणाऱ्यानी त्यांच्या Stories पवित्र शास्त्रात जोडल्या – असा खोटा शास्त्र विरोधी पाखंडवाद घेऊन काही लोक पुढे आले. परंतु त्यांच्या पाखंडवादा मध्ये काहीही तथ्य नाही. त्याला Higher Critics असे म्हटले आहे. J.E.D.P. Theory असे देखील या Theory ईश्वर परीज्ञान शाळा जी आहे Theology चे Seminaries आहेत तेथे शिकवले जातात. ही चुकीची Theory आहे. देवाचे वचन जर सांगते की, परमेश्वर देव मोशेशी बोलला म्हणजे तो त्याच्याशी बोलला. परमेश्वर देवाने ही वचने दिली, म्हणजे देवानेच दिली. असे गोळा केलेले संप्रदाय नाहीयेत हे. म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे, की, “एलोहीम” शब्द कधी वापरला व “यहोवा” शब्द कधी वापरला तर त्यापाठीमागे निश्चितच देवाचा काही हेतू होता. निर्मितीसाठी सामर्थ्य लागते. शून्यातून निर्मिती करण्यासाठी सामर्थ्य लागते आणि म्हणून “देवाने” आकाश आणि पृथ्वी निर्माण केली – या ठिकाणी देवाचे सामर्थ्य प्रकट करण्यासाठी “एलोहीम” हा शब्द वापरलेला आहे. परंतु ज्या वेळेस इस्राएल लोकांशी त्याचे वैयक्तिक नाते प्रकट करायचे आहे, आणि इस्राएल लोकांकडून उपासना स्वीकारण्याची वेळ येते त्यावेळेला तो यहोवा शब्द वापरत आहे. लक्षात ठेवा, पवित्र शास्त्रातील प्रत्येक शब्दामध्ये महान आणि गहन असा अर्थ दडलेला आहे.
God bless you.
Rev.Dr.Rajkumar Kore.
Kommentarer