top of page
Search
Writer's pictureRajkumar Kore

लेवीय पुस्तकातील गहन रहस्य !

भाग – १ २४-२-२०१८

Sermon on the book of the Leviticus in 2018



लेवीय पुस्तकातील गहन रहस्य !

Rev. Dr. Rajkumar Kore


(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)


(Summary By Br. Arvid Thorat nad Sermon by Rev Dr. Rajkumar Kore)


प्रस्तावना : पवित्र शास्त्रातील लेवीय पुस्क्तावरील जो अभ्यास (बायबल स्टडी) सध्या सुरु आहे त्यातील पहिल्या भागातील सारंश खाली दिले आहे.

सिंहावलोकन – (Recap).

  • नांव – Heb – वाईक्रा; Gk – लेविटीकॉन

  • लेखक – मोशे

  • काळ – ख्रि.पू. 1446.

  • स्थळ – सिनाय पर्वताजवळ

  • एकूण अध्याय – 27

  • लेवीय पुस्तकाचा उद्देश – भक्ती, पावित्र्य, छाया


लेवीय पुस्तकाचे प्रमुख भाग – पांच भाग

१) यज्ञ व अर्पणे

२) याजकीय नियम

३) शुद्धीकरणाचे नियम

४) नैतिक नियम

५) सण, मेळे व इतर नियम

भाग – १

यज्ञ व अर्पणे :-

  • अर्पणांचे पांच प्रमुख प्रकार

  • बायबलमधील यज्ञ पद्धती व विधर्मी यज्ञपद्धती यामधील फरक

  • देवाने इस्राएल लोकांना ‘यज्ञपद्धती’ का दिली?

मनुष्य देवासमोर का येऊ शकत नाही?

  • आज्ञाभंग

  • अभाव

‘बदलीच्या भरपाईचा उपाय’

यज्ञविधीमध्ये ‘रक्त’ का सांडले जात होते?

What was the meaning of shedding the blood?

  • Key Verse : – Lev. 17:11 – Life in the blood.

  • Law of Sin & death : – Rome. 8:2; Ez. 18:20; Ez. 18:4.

  • Life for life Law, i.e. Equal Justice : – Dt. 19:21

इस्राएलाला देवाने दिलेली यज्ञपद्धती व इतर विधर्मी राष्ट्रांची यज्ञपद्धती !

‘इस्राएलाच्या यज्ञपद्धतीतील ठळक वैशिष्ठे’ :

  • १) इस्राएलाच्या यज्ञपद्धतीमध्ये निवासमंडपात ‘यहोवा देवाची दृष्य समक्षता.’

  • २) रक्त पिण्यास मज्जाव.

  • ३) नरबळीला मज्जाव

  • ४) याजकांच्या वस्त्रातील सभ्यता.

  • ५) जारकर्म व अनैतिकतेला धर्मिक विधीत स्थान नाही.

  • ६) एकेश्वर वाद

  • ७) मूर्तीपूजेला विरोध

  • ८) नैतिक परिपूर्ण नियम.

  • ९) द्राक्षरसा सारखे मादक पदार्थ पिऊन उपासना करण्यास मज्जाव.

पापाचे ‘दोन’ प्रकार

  • १) अपूर्णतेचे पाप – 3:23; James 4:

  • उद्देशपूर्ती न करणे – 23:15

  • २) आज्ञाभंगाचे (उल्लंघनाचे पाप) – 1Jhn 3:4

  • (Crossing the mark)

बदलीचा उपाय :- Substitution Principle

  • Atonement :- भरपाई, प्रायश्चित, समेट

  • 8:23; Ex. 23:15

थोडक्यात स्पष्टीकरण : –

तसेच इब्री. १०:११ मध्ये सांगितले आहे की, “जुन्या करारातील अर्पणांनी पापे कधीही धुतली जात नसत.”

  • जर पापे धुतली जात नव्हती तर त्याचा अर्थ पशूंच्या रक्ताची ‘खंडणी’ अपूरी किंवा अयोग्य होती.

  • तरी सुद्धा देवाने यज्ञपद्धती व विधीनियम इस्राएल लोकांना का दिले? हा तर्कसंगत प्रश्न निर्माण होतो.

  • ‘तारण,’ मानवाची पापापासून सुटका व सार्वकालिक जीवन, हे केवळ देवाच्या कृपेनेच येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे कृपेनेच प्राप्त होते, कर्म केल्याने ते प्राप्त होत नाही; असे इफिस. २:८ हे वचन सांगते.

  • जर बायबल, जिवंत देवाचा शब्द जर स्पष्ट शब्दांत सांगत असेल तर ‘इस्राएल लोकांना देवाने यज्ञ पद्धती देऊन पशूचे रक्त सांडण्यास का सांगितले?

देवाने इस्राएल लोकांना ‘यज्ञविधी’ पद्धती का दिली?

पशूचा जीव, हा मानवी जीवाची खंडणी केंव्हाही भरून देऊ शकणार नव्हता तरीही देवाने इस्राएल लोकांना ‘यज्ञविधी’ लावून दिले, ‘याची कारणे अशी आहेत.’

  • १) प्रतिवर्षी करण्यात येणारे ‘यज्ञ’ हे पापांची जाणीव करून देऊन, पाप हे किती कमालीचे पाप आहे, हे ‘अर्पण करणाऱ्याच्या’ लक्षात आणण्यासाठी देवाने हे विधी लावून दिले.

  • इब्री. १०:३ – “परंतु त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्ष पापांची आठवण होत आहे.”

  • पापाचा दंड म्हणून पशूचे रक्त देव कधीच स्विकारणार नव्हता.

  • मीखा ६:६; यशया १:११

  • २) यज्ञपद्धती, इस्राएल लोकांना, दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे …

“तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची नियमशास्त्रात ‘छाया’ आहे, वास्तविक स्वरूप नाही;”

याचा अर्थ जुन्या करारातील यज्ञ पद्धती ही पुढे होणाऱ्या ‘चांगल्या गोष्टींची’ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मानवाला मिळणाऱ्या पापक्षमेची छाया होती. देवाने दिलेली यज्ञ पद्धती येशू ख्रिस्ताच्या अर्पणाचे अत्यंत तपशिलाने केलेले भविष्यात्मक वर्णन आहे.

43 views0 comments

Kommentare


bottom of page