top of page
Search
Writer's pictureRajkumar Kore

लेवीय मध्ये दिलेल्या गोष्टी कर्मकांड नाही



लेवीय मध्ये दिलेल्या गोष्टी कर्मकांड नाही

Sermon by Rev. Dr. Rajkumar Kore

(For video on this topic, please click on the link: goo.gl/wBvkE6)


(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)

(For video on this topic, please click on the link: goo.gl/wBvkE6)

कदाचित लेवीय पुस्तकातील काही भाग काही लोकांना embarrasing देखील वाटत असेल की, विधर्मी लोकांसारखे येथे देखील कर्मकांड आहे. त्याकाळच्या इस्राएलच्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कर्मकांडे होती, मग पवित्र देवाचा जो शब्द आहे, त्यामध्ये अशा प्रकारचे कर्मकांड असण्याची काय गरज आहे? दुसरे म्हणजे जुन्या करारात कर्मकांडे होती, पण मग नव्या करारात ती Cancel केलेली आहेत. मग नवीन करारा मध्ये जर ती कर्मकांडे उपयोगाची नाहीत, तर मग जुन्या करारात ती का ? याचे उत्तर आपण खालील भागात दिले आहे.

देवाने यज्ञ आणि अर्पणे किंवा शुद्ध अशुद्धतेचे नियम जे आहेत हे का दिले ? पशुच्या किंवा बैलाच्या रक्ताने मानवाचे पाप कधीच धुतले जात नाही असे देवाचे वचन सांगते. तरीदेखील आपण पाहतो की, होमार्पणासाठी यज्ञपशु कापला जात होता, रक्त सांडले जात होते, असे का ? आपण पाहिले की, जुन्या करारातील यज्ञार्पणे केली जात होती, हे प्रत्येक वर्षी आम्हाला कशाची तरी आठवण करून देते. आपण ते वचन पाहिले होते. इब्री. १० : ४ मध्ये सांगितलेले आहे, “बैलाचे व बकऱ्याचे रक्त मनुष्याचे पाप कधीच दूर करू शकत .” इब्री. १० : ११ मध्ये देखील तेच सांगीतेलेले आहे. तर मग प्रश्न असा आहे की, पापे जर धुतली जात नव्हती, तर यज्ञार्पणाची ही पद्धती देवाने का दिली ? याचे उत्तर आपण पाहिले होते की, परमेश्वर प्रती वर्षी करण्यात येणारे यज्ञ हे पापांची आठवण करून देऊन, पाप हे किती कमालीचे पाप आहे हे आम्हाला दाखवून देण्यासाठी देवाने इस्राएल लोकांना ही यज्ञ पद्धती दिली होती. इब्री. १० : ३ मध्ये स्पष्ट शब्दात या अर्पणाचा उद्देश दिलेला आहे. इब्री १० : ३ मध्ये “त्या यज्ञामुळे वर्षानुवर्षे पापांची आठवण होत आहे.” पापाचा दंड म्हणून देव पशूचे रक्त कधीच स्वीकारणार नव्हता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.


दुसरी गोष्ट किंवा दुसरा उद्देश यज्ञार्पणे देण्यामागचा हा होता की, प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देव जे महान कार्य ‘तुमच्या आणि माझ्या तारणाचे करणार होता त्याची ती एक छाया होती. प्रतीकात्मक नमुना होता आणि म्हणून देवाने अतिशय सविस्तर रीतीने हे वर्णन दिलेले आहे. कारण तशाप्रकारे येशू ख्रिस्ताने आपली कामगिरी शब्दशाहा पार पाडलेली आहे. आपण हे पाहिले की, यज्ञ देण्यामागचा देवाची काय योजना होती.


God bless you.


Rev. Dr. Rajkumar Kore



69 views0 comments

Comments


bottom of page